बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील ‘या’ राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; उद्यापासून होणार अनलॉकला सुरुवात

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच दिल्लीमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. हळूहळू दिल्लीतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात दिल्लीमध्ये अवघ्या 381 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना हळूहळू रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने दिल्ली आता अनलाॅकच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. रविवारी एका दिवसात 34 जणांचा दिल्लीमध्ये कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 0.5 टक्के रुग्णवाढीचा दर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिल्ली कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच उद्यापासून दिल्लीमध्ये अनलाॅकची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. त्याबरोबरच मागच्या 24 तासात 58 हजार 91 नागरिकांचं लसीकरण दिल्लीमध्ये करण्यात आलं आहे.

दिल्लीमध्ये आतापर्यंत 43 लाख 66 हजार 002 जणांना लसीचा पहिला डोस मिळाला असून 12 लाख 84 हजार 817 जणांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दिल्लीमध्ये मेट्रो ट्रेन 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच या पुढील परिस्थिती पाहून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

पुणेकरांसाठी खूशखबर! अखेर ‘या’ मार्गे पुण्यात झालं मान्सूनचं आगमन

टीम इंडीयाच्या ‘या’ अनुभवी खेळाडूनं किचनमध्ये दाखवली आपल्या हाताची जादू; पाहा व्हिडीओ

WTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो

‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रूग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनसाठी रुग्णालयाला द्यावं लागणार हमीपत्र

खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More