नवी दिल्ली | प्रत्येक माणूस काम करतो आणि त्याचा मोबादला त्याला पैशात मिळतो. पण तुम्हाला असं म्हणलं की, जर तुम्ही काम केलं तर पैसे मिळणार नाही. तेव्हा किती लोक काम करतील? कदाचित मोबदल्याचा विचार न करता निस्वार्थ काम करणाऱ्या माणसांचं प्रमाण खूपच कमी असेल. अगदी बोटावर मोजण्याइतकं. पण आता तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे, जो तब्बल ३२ वर्षांपासून एकही रुपये न घेता काम करत आहे.
सीलमपुर भागात लाल बत्ती चौकात पोलिसासारख्या गणवेशात ७२ वर्षीय गंगाराम नावाच्या व्यक्ती रोज तिथेच असतात आणि त्यांच्या हातात एक काठीही असते. त्या चौकातील वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. गंगाराम रोज सकाळी ९ ते रात्री पर्यंत १० काम करतात.
काही वर्षांपूर्वी गंगाराम यांच्या एकुलता एक मुलाचा अपघात झाला आणि त्या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या बायकोचाही मृत्यू झाला. आता कुटुंबात गंगाराम हे एकटेच पडले. यानंतर गंगाराम यांनी ठरवलं की जोपर्यंत ते जिवंत आहे, ते रात्रंदिवस वाहतूक नियंत्रणाची सेवा करणार, जेणेकरून कोणत्याही घरातील मुलाला किंवा मुलीला आपला जीव गमवावा लागणार नाही.
गंगाराम यांना दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी पोलिसांच्या आणि सामाजिक संस्थांच्या हस्ते विविध पुरस्कार मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे हराम आहे”
आयर्लंडच्या ‘या’ खेळाडूने सामन्यात मारलेल्या छक्क्याने चक्क त्याच्याच गाडीची काच फुटली!
मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचा भाजप संबंध तपासा- अनिल देशमुख
‘या’ शिवसेना आमदाराला कोरोनाची लागण!
ड्रग्सविषयीचे ते चॅट मीच टाइप केले होते- रिया चक्रवर्ती
Comments are closed.