बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या”

मुंबई | गेल्या तीन दशकापासून भारताचं राजकारण हे राम मंदिर (Ram Mandir) आणि बाबरी मस्जिद (Babri Masjid) याविषयाभोवती फिरताना दिसत आहे. 29 वर्षापूर्वी 6 डिसेंबरला म्हणजेच आजच्याच दिवशी भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), विश्व हिंदूपरिषद, बजरंग दल यांसारख्या हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत बाबरी पाडण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्भिडपणे शिवसेनेनी बाबरी पाडली, असं म्हटलं होतं. अशातच आता बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा भारतरत्न (BharatRatna) द्या, अशी मागणी केली जात आहे.

विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, गोरख पिठाधीश्वर अवेद्यनाथ आणि रामचंद्र परमहंस यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर बाबरी पाडल्याचा आम्हाला गर्व आहे, असंही प्रविण तोगडिया म्हणाले आहेत.

आपला जन्मपण झाला नव्हता तेव्हापासून हिंदू लढत होते. चार लोकांचं नेतृत्व नसतं तर बाबरी पाडली नसती आणि त्याठिकाणी आज मंदिर उभं राहिलं नसतं, असं तोगडिया म्हणाले आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यासह तिन्ही नेत्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी प्रविण तोगडिया यांनी केली आहे.

दरम्यान,या चारही दिग्गजांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत भारत सरकारने राम मंदिर आंदोलनाचा सन्मान केलेलाच नाही, असं मी म्हणेल. आज राम मंदिराच्या मुद्द्यामुळे तुम्ही सत्तेत आहात, त्यामुळे त्याची ऋणमुक्ती करावी, असंही प्रविण तोगडिया यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मथुरेत तणावाचं वातावरण, शहरात कलम 144 लागू

शिवसेना काँग्रेसचा हात धरणार का?; संजय राऊतांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

ठाकरे सरकारला मोठा झटका! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

“आनंद दवे हा डॅंबिस माणूस, त्यांनी…”, शरद पोंक्षेंची फेसबूक पोस्ट चर्चेत

“आईचे दूध पिलेले असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More