बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘घटना सर्वांसाठी सारखीच’, संजय राऊतांचा शिंदे सरकारला इशारा

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यात आता सगळेच पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शिंदे गटाचे आमदार रोज बंडाची नवी कारणे सांगत आहे. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता यावर मोेठे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रात सुरु असलेला राजकीय पेच यापूर्वी कधीच निर्माण झाला नव्हता. संपुर्ण राज्य आणि लोकशाही कायद्याच्या पेचात अडकली आहे, असे प्रतिपादन राऊत यांनी केले आहे. राज्यातील बंडखोर आमदारांपैकी 16 आमदारांवरील कारवाईचा खटला न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने त्याच्या निकालाला विलंब करत महाराष्ट्रातील पेच कायम ठेवला आहे, असे राऊतांचे म्हणणं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडून शांत न रहाता शिवसेनेचे 12 खासदार देखील यशस्वीरित्या फोडले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर आणि शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा ठोकला. त्यांनी आपला गट हीच खरी शिवसेना म्हंटले आहे. यावर राऊतांनी भाष्य केले आहे. त्यांची ही भूमिका म्हणजे कातडी बचाव भूमिका आहे. घटना सर्वांसाठी सारखी असते, असे राऊत म्हणाले.

घटना लोकांसाठी असते, लोक घटनेसाठी नसतात. घटनेतील दहाव्या शेड्युलनुसार (Schedule 10) 16 फुटीर आमदार सरळ सरळ अपात्र ठरतात. सरकार वाचविण्यासाठी आणि शिवसेनेला कायमचे संपवून टाकण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) या आमदारांना पाठीशी घालत आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court of India) घटनापीठ कोणता निर्णय घेते? यावर आता देशाचे आणि लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

नीरज चोप्राचा चंदेरी विजय, वर्ल्ड चँपियनशिपमध्ये रचला नवा इतिहास

येत्या तीन महिन्यात मध्यावधी निवडणुका लागणार?, रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

सध्याच्या राजकारणावर नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शिवसेना फोडल्याचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंनाच – राज ठाकरे

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More