बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“निर्णय तर मोदींचा होता पण, त्यामागे डोकं कोणाचं होतं?”

मुंबई | लखीमपूर खीरी येथील हिंसाचार प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. राज्यात सत्ताधारी असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे बडे नेते बंदमध्ये सहभागी झाले होते. राज्यातील या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

शेतकरी समर्थनार्थ देशव्यापी बंदला महाविकास आघाडी सरकारने दिलेला पाठिंबा हा केवळ दिखावा होता, असा आराेप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मोदींना कृषी कायदे बनवण्यामागे डोकं कोणाचं होतं? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना प्रकाश आंबेडकर राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते. मात्र, मागील 4 महिन्यापासून आंबेडकर रजेवर गेले होते. त्यावेळी त्यांनी वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदावर प्रभारी म्हणून रेखा ठाकूर यांनी नेमणूक केली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसतंय.

दरम्यान, रजेवर जाण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत युतीचे संकेत दिले होते. मात्र, त्यांनी आता थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केल्याने आता वंचित आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

भारत-पाक सामन्याआधी ‘विराट-बाबरचं वाकयुद्ध’; विराट कोहलीचं जोरदार प्रत्युत्तर

“काही लोक गांजा मारून काम करतात, त्यांची नार्कोटेस्ट करावी”

निवडणुकीआधी भाजपला खिंडार! ‘हा’ मोठा नेता पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर

T-20 वर्ल्ड कपआधी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला…

रक्षकच ठरला भक्षक! वडिलाने केला अवघ्या 11 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार

दिवाळीत कांदा पुन्हा रडवणार, कांद्याच्या भावात अचानक वाढ; जाणून घ्या कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More