बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

कोल्हापूर | मराठा आरक्षणप्रकरणी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर ठाकरे सरकार अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी अचानक श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे.

अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेस इथे भेट घेतली आहे. या भेटीवेळी संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते. मराठा आरक्षणाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाहू महाराज आणि अजित पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्यांचं लक्ष वेधणारी ही भेट आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही खासदार संभाजीराजे यांनी दिला होता.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून थेट अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतल्यानं मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत करण्यास सरकार यशस्वी ठरेल की, संभाजीराजे आपलं आंदोलन चालूच ठेवतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

भाई जगतापांची पोलिसांना धक्काबुक्की; भाई जगतापांसह 50 जणांवर गुन्हा

पालकमंत्री छगन भुजबळांना डच्चू?; संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

जुन्या परंपरेला फाटा देत पाच मुलींचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा; लाडक्या बाबांना पोरींचा अखेरचा निरोप

“सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला मारलंय”

“काय भाषा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीतरी मान ठेवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More