मुंबई | एकनाथ शिंदे यांनी बंड करुन आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन भाजपसोबत संयुक्त युती करुन सरकार स्थापन केलं. भाजप मोठा पक्ष असाताना देखील एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली.
राज्यातील सरकार हे भाजप आणि शिवसेनेचे सरकार आहे, असं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल (2 जुलै) रोजी शिंदे गटाचे बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईत दाखल झाले. ते सर्व आमदार ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये थांबले आहेत. याच हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत फडणवीसांनी हे वक्तव्य केलं आहे.
सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा 11 दिवसांचा प्रवास करुन एकनाथ शिंदे समर्थक आमदार मुंबईत दाखल झाले. ताज हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आमदारांची बैठक घेऊन आमदारांना संबोधित केलं. राज्यातील नवं सरकार शिवसेना आणि भाजपचं असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. त्यामुळे आता शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हा वाद गेले दहा दिवस सुरु असून 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची पक्षनेते पदावरुन हाकलपट्टी करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या –
“तीन दशकातील मराठी रंगभूमीला व्यामीश्र संघर्षाची पार्श्वभूमी”
“शिवसेनेची एकनाथ शिंदेंवरील कारवाई बेकायदेशीर, त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ”
शिवसेनेने जारी केलेल्या व्हिपबद्दल एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले…
कोरोनाने टेंशन वाढवलं, 24 तासातील धडकी भरवणारी आकडेवारी समोर
‘शेवटी अंत जवळ आला आहे’, किरीट सोमय्यांची बोचरी टीका
Comments are closed.