देश

आरबीआयचे गव्हर्नर सरकारला थेटपणे का सांगत नाहीत, की…- पी. चिदंबरम

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. करोनामुळे जगभरातील अर्थव्यस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात तसंच रिव्हर्स रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेपो दरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिली. दरम्यान, 2020-21 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

जर अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार आहे, तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यात अधिक भांडवल ओतण्याची काय गरज, असा सवाल पी. चिदंबरम यांनी केली आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणतात मागणीमध्ये मोठी घट झाली आहे. 2020-21 मध्ये जर अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार आहे, तर त्यांना अर्थव्यवस्थेत अधिक भांडवल ओतण्याची काय गरज आहे? त्यांनी सरकारला सांगायला हवं तुम्ही तुमच काम करा, आर्थिक उपाययोजना करा, अशा आशयाचं ट्विट चिदंबरम यांनी केलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

देशभरातून 13 लाख 54 हजार पेक्षाही अधिकजण उत्तर प्रदेशला परतले

धक्कदायक! फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह

महत्वाच्या बातम्या-

“राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक, मजुरांच्या हाल अपेष्टांना काँग्रेसच जबाबदार”

“राज्य सरकारला विरोध केला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही, मग केंद्राला विरोध करणारे देशद्रोही का?”

पुण्यात आज 92 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज; पाहा किती रुग्ण वाढले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या