बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देसी जुगाड! बैल आणि ट्रॅक्टरशिवाय पठ्ठ्यानं नांगरलं शेत; पाहा व्हिडीओ

मुंबई | आपल्या सर्वांचा उदरनिर्वाह शेतीवरच होत असतो. त्यामुळे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. सगळ्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेतकरी दिवसरात्र राबत असतो. शेतात चांगलं पीक यावं यासाठी नवनवीन कल्पना राबवत असतो. अशातच सध्या एका शेतकऱ्याचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या एका शेतकरी तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी तरुण चक्क बाईक घेऊन नांगरणी करताना दिसत आहे. बैल आणि ट्रॅक्टरशिवाय केलेली ही नांगरणी नेटकऱ्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे काही क्षणातच हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झालेला पहायला मिळाला.

तरुणानं आपल्या बाईकला मागून छोटा नांगर जोडला आहे. जास्त मेहनत न घेता अगदी सहजरित्या नांगरलं जात असल्याचं दिसत आहे. तरुणानं केलेला हा देसी जुगाड पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

दरम्यान, jugaadu_life_hacks इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी याला लाईक केलं असून भन्नाट कमेंट्सही दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –  

 

 

View this post on Instagram

 

A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

थोडक्यात बातम्या – 

“सब गोलमाल है! मी कट-कमिशन खाल्लं तर बुडबुड घागरी!”

पंजाबमध्ये राजकीय गोंधळ! पंजाब काँग्रेस अध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धूच राहणार

“पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झालेत”

अंगणात दबा धरून बसला बिबट्या, अचानक महिला समोर आली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

ठाकरे सरकार अॅक्शन मोडमध्ये; ‘त्या’ कंत्राटदारांवर करणार तात्काळ कारवाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More