बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्क मोबाईलच्या किमतीत मिळणार ही दुचाकी, पाहिलीत का….??

नवी दिल्ली | आतापर्यंत आपण सर्वांनी मोबाईल किंवा अन्य उपकरणं अगदी स्वस्तात घेतली आहेत. पण एका कंपनीने चक्क मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रीक दुचाकी लाँच केली आहे. दिल्लीतील स्टार्ट अप Detel इंडिया कंपनीने फक्त १९,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध करून दिली आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, ही जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक दुचाकी आहे. या गाडीचे नाव Detel Easy असं आहे. या गाडीत २५० वॅट इलेक्ट्रीक मोटर दिलेली आहे. यामध्ये नॉन रिमुवेबल बॅटरी नीट बसण्यासाठी पुरेशी जागा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी अ‌ॅडव्हान्स ब्रेक ड्रम सिस्टीम देण्यात आली आहे.

कंपनीचा दावा आहे की, प्रति किलोमीटर फक्त २० पैसे खर्च येतो. ही गाडी Pearl White, Metallic Red आणि Jet Black या तीन रंगात उपलब्ध आहे. गाडीची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ६० किलोमीटर धावू शकते. गाडीचा वेग २५ किलोमीटर प्रतितास आहे. गाडीची बॅटरी ७-८ तासात पूर्ण चार्ज होते.

ग्राहकांना ही गाडी ऑनलाईन संकेतस्थळावरून खरेदी करता येईल. या दुचाकीला कोणत्याही वाहन परवान्याची गरज नाही. सध्या सरकार इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर वाढवण्यासाठी त्यांच्यावर सवलत देत आहे. नुकतंच दिल्ली सरकारने इलेक्ट्रीक गाडी खरेदीवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मी डॉक्टरांचा अपमान नाही तर कम्पाऊंडरचा सन्मान केला, ‘त्या’ वादावर राऊतांचं स्पष्टीकरण

सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी घरी गेलेल्या ‘त्या’ मिस्ट्री गर्लचं गुपीत आलं समोर…

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन

“…तर कोरोनाच्या लसीसाठी मी माझं शरीर देईन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More