पुणे | ‘शिवांजली सखी मंच’च्या वतीने ‘इंद्रायणी थडीचे’ आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत आमदार महेश लांंडगे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी पुजा लांडगेही उपस्थित होत्या. ‘इंद्रायणी थडी’ 30 जानेवारी 31 जानेवारी आणि 1,2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच ‘इंद्रायणी थडी’चे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
या जत्रेत महिलांच्या सक्षमिकरणासोबत स्वत;ची सुरक्षा कशी करावी यासाठी कराटे प्रशिक्षणाचे क्लासेसही ठेवण्यात आले आहेत. तसेच अनेक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिकृती दाकवण्यात येणार आल्याचंही लांडगे यांनी सांगितलं.
दरम्यान, या जत्रेत सहभागी झालेल्या महिलांच्या स्टॉलला प्रतिसाद देऊन या महिलांच्या कष्टाला साथ देण्याचंही महेश लांडगे यांनी सर्वांना आवाहन केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘फुलराणी’ने घेतलं ‘कमळ’ हाती; दिल्ली विधानसभेचा करणार प्रचार
‘माझे पती विनाकारण देशासाठी शहीद झाले’; वीरपत्नीची खंत
महत्वाच्या बातम्या-
शिवभोजनासाठी भलीमोठी रांग; गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा बंदोबस्त
“अरविंद केजरीवाल हे दहशतवादीच आहेत”
…म्हणून मी भाजपत प्रवेश केला- सायना नेहवाल
Comments are closed.