अहमदनगर | गेली 7 दिवसांपासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले आहेत.
लोकपाल, लोकायुक्त, शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत. त्यांची दखल आता मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि अण्णा यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु आहे. त्यामुळे चर्चेनंतर अण्णा उपोषण सोडतील का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
दरम्यान, गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी अण्णा दुपारपर्यंत उपोषण सोडतील, असं म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-चक्क ‘राज्यपालां’वर फेकले कागदाचे बोळे; एक आमदार बेशुद्ध
-‘या’ बंधूंना विक्रमाची संधी! प्रथमच एकत्र खेळणार आंतरराष्ट्रीय सामना?
–लोकसभेच्या तिकीटासाठी कायपण! काँग्रेस नेता राहुल गांधींच्या पाठीमागे थेट दुबईपर्यंत
–नरेंद्र मोदींचा ‘किंगमेकर’ आता शिवसेनेच्या गोटात?
-सायकलिंग स्टंटचा काळजाचा ठोका चुकविणारा व्हीडिओ नक्की बघा!