मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा 4 मार्च रोजी विधानभवनात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
मुख्यमंत्रिपद हातून जाताच देवेंद्र फडणवीसांनी ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक लिहलं. फडणवीसांनी यापूर्वी अर्थसंकल्पाबाबत आमदारांसाठी पुस्तकं लिहली. मुख्यमंत्रिपदाचा भार हलका झाल्याने त्यांना हे पुस्तक लिहण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. अर्थशास्त्राचे विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी हे पुस्तक फायदेशीर ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, विधान परिषदेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सत्ताधारी फडणवीसांच्या पुस्तकावर काय बोलतील हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. सत्ता पालटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी लिहलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त फडणवीस, पवार आणि ठाकरे हे तिघेही एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
अहमदनगरच्या आरोपींना मोक्का लावा- तृप्ती देसाई
फी दरवाढ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर कारवाई होणार का??; बच्चू कडू म्हणाले…
महत्वाच्या बातम्या-
मोदींनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णायाचं रोहित पवारांकडून कौतूक पण…
धक्कादायक! सारथी संस्थेच्या कामकाजात अनियमितता; चौकशी समितीचे ताशेरे
चोरट्यांनी चक्क भाजप नगरसेविकेलाच लुटलं!
Comments are closed.