नागपूर महाराष्ट्र

फडणवीसांची गोलंदाजी हार्दिक पांड्याला पडली भारी; पाहा व्हिडीओ-

नागपूर |  शनिवारी 25 जानेवारीला नागपूरमध्ये ‘खासदार क्रिडा महोत्सव’ या स्पर्धेचा मोठ्या थाटामाटात समारोप करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली गोलंदाजी भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला चांगलीच भारी पडली. कारण फडणवीसांनी केलेल्या गोलदांजीवर पांड्याला फटका मारता आला नाही.

खासदार क्रिडा महोत्सवात  भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरला. त्याचबरोबर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

नागपूरात झालेल्या स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी फडणवीस आणि गडकरी यांनी पांड्यासोबत क्रिकेट खेळत कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसंच त्यांनी गोलंदाजी करत पांड्याला बोल्ड करण्याचा डाव साधला.

देवेंद्र फडणवीस राजकारणाच्या मैदानात फटकेबाजी करताना तर दिसतातच पण क्रिकेट खेळताना पहिल्यांदाच दिसले. संधीचा फायदा घेत पांड्यानेही मोठे शाॅट मारत सगळ्यांचे मनोरंजन केले.

 

 

ट्रेंडिंग बातम्या – 

दिल्लीसाठी भाजपनं जाहीर केली प्रचारकांची यादी; मोदींच्या नावाचाही समावेश

नसिरुद्दीन शहा भडकले; अनुपम खेरांना म्हणाले जोकर!

ऐकावं ते नवलच! काँग्रेस जैन… पक्षाचं नव्हे मुलाचं नाव!

महत्वाच्या बातम्या –

भीमा-कोरेगाव प्रकरणात केंद्र सरकारला कोणाला तरी वाचवायचंय- अनिल देशमुख

आम्ही करु शरद पवारांचे रक्षण; महाराष्ट्र केसरी सरसावले!

मुंबईच्या नाईट लाईफवर अमृता फडणवीसांचा सवाल

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या