बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्ही राज्यपालांकडे गेलो तर तुम्हाला एवढी मिरची का लागते? फडणवीसांचा निशाणा

मुंबई |  गेले काही दिवस भाजप नेत्यांच्या राजभवनावरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यावरून बरंच राजकारण पाहायला मिळालं. महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेत भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हटलं. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या याच टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही राज्यपालांकडे गेलो तर तुम्हाला एवढी मिरची का लागते?, अशी विचारणा करत कुणाला कितीही मिरची लागली तरी आम्ही यापुढे देखील राज्यपालांकडे जाऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे.

शिवसेना आमच्यासोबत सत्तेत असताना त्यांचे मंत्री, शिष्टमंडळ हे कर्जमाफीवरुन राज्यपालांकडे सतत जात होते. तेव्हा राजकारण सुरु नव्हतं का?, असा सवाल विचारत त्यांनी शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं.

राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे राज्यपालांना भेटण्याचा अधिकार हा संविधानाने दिला आहे. त्यामुळे माझं सांगणं आहे की, आधी संविधानाचा अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

महत्वाच्या बातम्या-

अक्षय बोऱ्हाडे आणि सत्यशील शेरकर वादाला मोठी कलाटणी

कोरोना मुकाबल्‍यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण भाग कसा झालाय सज्‍ज… पाहा-

चित्रपट, मालिकांच्या शुटिंगबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More