बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकरी कर्जमाफी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी- देवेंद्र फडणवीस

परभणी | शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. शेतकरी कर्जमाफी म्हणजे आर्थिक अडचणींवर केलेली तात्पुरती मलमपट्टी आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परभणीतील कृषी फेस्ट कार्यक्रमात बोलत होते.

शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ करणारे तंत्रज्ञान विकसित करावं लागंल. तरच शेती शाश्वत होऊ शकेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर वेगवेगळ्या पातळीवर रचनात्मक बदल करण्याची गरज असल्याचंही फडणवीसांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी सरकारच्या नाईट लाईफ योजनेवरही टीका केली. श्रीमंतांच्या मुलांच्या नाईटलाईफची काळजी तुम्ही घेतली, आता शेतकऱ्यांच्या नाईट लाईफची काळजी कधी घेणार, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

गणपतीच्या रांजणगावमध्ये अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड

हिंगणघाटच्या पीडितेचा संपूर्ण खर्च मी उचलतो- आनंद महिंद्रा

महत्वाच्या बातम्या-

हिंगणघाटच्या पीडितेचा संपूर्ण खर्च मी उचलतो- आनंद महिंद्रा

प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या तमाशाच्या फडावर जीवघेणा हल्ला

“नाईट लाईफमुळे श्रीमंतांच्या मुलांची सोय झाली, पण शेतकऱ्यांच्या मुलांचं काय?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More