बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भास्कर जाधवांच्या त्या वर्तनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई | अतिवृष्टी झालेल्या कोकण विभागातील रत्नागिरीमधील चिपळूण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महिलेवर हात उगरत अरेरावी केली होती. याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांनी यावरून भास्करांवर जोरदार निशाणा साधला आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून भास्कर जाधवांवर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं. जनतेमध्ये आक्रोश असताना त्यावेळी त्यांच्या अंगावर जाणं योग्य नाही. अशा घटना घडतात तेव्हा जनतेमध्ये आक्रोश असतो. जनता ही तुमच्या विरोधात नसते. त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर धावून जाणं योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रविवारची घटना धक्कादायक होती, भास्कर जाधव हे वरिष्ठ आमदार आहेत आणि ते मंत्रीही होते. त्यांचं कालचं वर्तन हे योग्य नव्हतं. जाधव याबाबत नक्कीच आत्मचिंतन करतील, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. यावेळी बोलताना फडणवीसांनी राज्य सरकारला कोकणवासियांबाबत आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाले की, ती महिला माझ्या मुलीसारखी होती. लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दाैरा रद्द; विशेष विमानाने मातोश्रीकडे रवाना

तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पुणे पोलिसांनी दिलं चांगलंच बड्डे गिफ्ट!

“मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय?”

“दिवसभर सायकल चालवून भाजपसाठी काम केलं, तेव्हा…”

सिंहगडच्या पायथ्याशी हॉटेलमध्ये डान्स पार्टी; पोलिसांनी 11 जणांना शिकवला धडा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More