Top News महाराष्ट्र मुंबई

ऐकमेकांची डोकी फोडायचीत तर फोडा, पण विज बिलाचं आश्वासनं पूर्ण करा- देवेंद्र फडणवीस

मुंबई | हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. अधिवेशनात विरोधी पक्षेनेते यांनी वीज-बिलावरून संताप व्यक्त करत राज्य सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले.

सरकारने राज्यातील जनतेची सरळसरळ फसवणूक केली आहे. ज्यांनी वीज वापरली त्यांनी बिल भरायला हवं याबद्दल दुमत नाही पण ज्यांनी वीज वापरली नाही तर त्यांनी का बिल द्यायचं?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केला आहे.

फडणवीसांनी सरकारमधील विसंवादावर बोलताना मंत्रिमंडळातील नेत्यांच्या वक्तव्याची काही उदाहरणं देत फडणवीस म्हणाले, तुम्हाला ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा मिटवा.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विज बिलासंदर्भात मौन धारण केलं, एक अक्षरही ते बोलले नाहीत, हा कसला संवाद आहे, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यंत्र्यांवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

‘भारतात फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण’; राहुल गाधींचा गंभीर आरोप

“अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही”

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं”

वर्षेभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालंच ना?- आशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या