बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, आम्ही साहेबांचेच कार्यकर्ते”

पुुणे | महाराष्ट्रातील भाजप नेते नारायण राणेंसह चार मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला गेला आहे. यामध्ये नारायण राणे यांची कॅबिनेट तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील दिंडोरीच्या खासदार भारती पवार आणि राज्यसभा खासदार भागवत कराड यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.

यामध्ये मुंडे कुटुंबातील कोणाची वर्णी न लागल्याने प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतंय. यावर पंकजा यांनी आपली प्रतिक्रिया देत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीच आम्हाला घडवलं. मी आणि भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते आहोत, असं सांगत पंकजा मुंडे यांनी आज जी भूमिका मांडली तीच भाजपची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, केंद्रात सहकार खाते नव्हतं तर म्हणायचे केंद्र सरकार सहकाराला मारतं आहे. आता 70 वर्षांनी पहिल्यांदा सहकार खातं तयार झालं तर म्हणतात की, सहकाराचा केंद्राशी काय संबंध?, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली.त्यासोबतच या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा लाभ होईल, असंही फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“मोदी सरकारने देश उध्वस्त करायचं ठरवलं असेल तर काय करणार?”

“ईडीच्या माध्यमातून एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने आणि राजकीय हेतूने चौकशी सुरू आहे”

…म्हणून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं – देवेंद्र फडणवीस

“मी एवढी मोठी नाही की, मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील”

“टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी-मी असं चालत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More