मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा जन्मदिवस आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यामुळे आज सोशल मीडियावर राज्यभरातील नेते आणि कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांच्या कार्याची आणि विचारांची पेरणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन केलं आहे.
फडणवीसांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले की, “गोपीनाथ मुंडेंनी मला एक राजकीय मंत्र दिला, संघर्ष करायला आम्ही जे शिकलो ते गोपीनाथरावांमुळेच शिकलो. गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे. देवेंद्र… जीवनात मोठं व्हायचं असेल तर सत्तेशी समझोता करु नको, सत्तेशी संघर्ष कर. सत्तेशी समझोता करुन कोणालाही पुढे जाता येत नाही, मोठं होता येत नाही. पण, सत्तेशी संघर्ष केल्यानंतर आपणास जीवनात मोठं होता येतं”.
गोपीनाथराव प्रत्यक्ष रुपाने नसले तरी, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठिशी आहे. कितीही संकटं आली तरी, संकटावर मात करायला आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो असल्याचेही फडणवीसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांना त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन विनम्र अभिवादन केलं आहे.
स्व. गोपीनाथजी मुंडे : हिंमत-आत्मविश्वास जागविणारे आणि आम्हाला संघर्षाचा मूलमंत्र देणारे नेते! pic.twitter.com/VDSqJgdo6Q
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2020
थोडक्यात बातम्या-
पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…; भाजपचा शिवसेनेला टोला
महासागराप्रमाणे खोली अन्…!म्हणत रोहित पवारांनी आजोबांना दिल्या खास शुभेच्छा
“…तर 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला पाहावा लगला नसता”
धक्कादायक! ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू
जय जवान, जय किसान; वाढदिवसाच्यानिमित्त युवराज सिंगचं चाहत्यांना ‘खास’ आवाहन