बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संजय राऊतांनी ‘हे’ काम बंद करावं’; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना सल्ला

मुंबई | पेगॅसस फोन टॅपिंग प्रकरणावरून देशातील राजकारण तापलं आहे. इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीने पेगॅसस हे हेरगिरी तंत्रज्ञान विकसित करून जगातील 1400 मोबाईल क्रमांक हॅक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातदेखील याचा वापर झाल्याचं शिवसेना संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावरून विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना खोचक असा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रातही अशा प्रकारची तंत्रज्ञान आणि यंत्रणा आम्हाला रोखण्यासाठी वापरली गेली आणि आजही वापरली जात असावी. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि सरकारी मदतीशिवाय अशा प्रकारचं धाडस आणि हिम्मत कोणी करु शकत नाही. या देशातल्या पत्रकारांह हजारो प्रमुख लोकांसह फोन रेकॉर्ड झाले आहेत. त्यामुळे या चोऱ्यामाऱ्या बंद करणं थांबवलं पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

संजय राऊत म्हणतात जे यामध्ये आहेत, त्यांची नावं हळूहळू बाहेर येतील. येऊ देत जे खरं असेल ते बाहेर येईल. पण साप सोडून भुई थोपटण्याचं काम त्यांनी बंद केलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत एनएसओची कोणतीही सेवा महाराष्ट्र सरकारने घेतलेली नाही. डीजीआयपीआरचं शिष्टमंडळ गेलं होतं, पण निवडणुकांच्या नंतर गेलं होतं. ते देखील इस्त्रायलची शेती तंत्रज्ञान याविषयी माहिती घेण्यासाठी गेले असल्याचं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राज कुंद्राच्या समर्थनार्थ उतरली गहना; एकता कपूरचं नाव घेत म्हणाली…

अभिनेत्रींना ‘हे’ आश्वासन देऊन करुन घ्यायचे बोल्ड सीन्स, मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा

शेळीनं 8 पायांच्या पिल्लाला दिला जन्म मात्र अवघ्या पाच मिनिटानंतर…

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More