महाराष्ट्र मुंबई

ठाकरे सरकारला मराठा आरक्षण कायम राखता आलं असतं पण…- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आम्ही सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिवस रात्र एकत्र करून प्रयत्न केले होते. फक्त आम्हाला ते विधीमंडळात आम्हाला टिकवून ठेवता आलं नाही. राज्यभर झालेल्या आंदोलनाला कायदेशीर आधार दिला. त्यावेळी प्रकरण उच्च न्यायलयात गेलं तिथं प्रयत्नांची पराकाष्टा करत आंदोलन टिकवलं. परंतू आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐकून व्यथित झालो असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने सुरूवातीपासूनच दुर्लक्ष केलं. कधी वकील हजर नव्हते तर कधी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही. गेले सात महिने मागासवर्गीय आयोग गठीत केला नव्हता त्यासाठी मी पत्रव्यवहारही केला मात्र त्याला कोणतेही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे राज्य सरकारने दाखविलेल्या निष्क्रियतेचा आणि असंवेदनशील हाताळणीचा हा परिणाम असल्याचं म्हणत फडणवीसांनी टीका केली आहे.

दरम्यान, सरकारने याला दाद दिली नसली तरी आपण मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात आपण खंबारपणे सोबत आहोत त्यांनी एकटं समजू नये आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस- चंद्रकांत पाटील

‘जे पेराल तेच उगवेल’; रियाच्या अटकेवर शेखर सुमनची प्रतिक्रिया

तुम्ही कंगणाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही- गीता फोगट

‘कोरोना सोडून नको त्या विषयांवर आपण चर्चा करतोय’; उर्मिला मातोंडकर संतापली

कंगणाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाली…’कल तेरा घमंड टुटेगा’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या