बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते होते.

अमित शहांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, पृथ्वीराजबाबा देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कुल आदी नेत्यांचा समावेश होता.

देवेंद्र फडणवीसांनी स्वत: या भेटीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. साखर उद्योगाच्या विविध समस्यांसंदर्भात आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची एका शिष्टमंडळासोबत भेट घेतली, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना  फडणवीसांनी भाजप नेत्यांसह अमित शहांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

‘तुम्ही प्रचार करू नका’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं शरद पवारांना पत्र

विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात पुणे विद्यापीठाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

एकाने चूक केली म्हणून संपूर्ण पोलीस दल चुकीचं नसतं- हेमंत नगराळे

“जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?”

सिक्सर किंग फक्त युवराज सिंगच; एका षटकात ठोकले 4 गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More