बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास!

नंदुरबार | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजप नेत्याला भावी सहकारी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय चर्चाँणा उधाण आलं आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे दिवंगत माजी आमदार पी.के अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तेव्हा या कार्यक्रमाला फडणवीस आणि जयंत पाटील हे दोन्ही नेते उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना आणि जाताना हे दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी आहे का,?पत्रकारांच्या या प्रश्नांवर महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही, त्याचबरोबर हे कार्यक्रमांमध्ये होतच असते. ते फार काही मनावर घेऊ नये, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावर उपस्थित आजी माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी असं म्हटलं होतं. त्यानंतर राज्यभर सेना-भाजप युती होणार अशा चर्चांणा उधाण आलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

…आता तर कोथळा काढायची भाषा वापरली जाते- शरद पवार

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं मोठं वक्तव्य

‘आजकालचे क्रिकेटपटू कोणताही मोठा निर्णय….’; विराटच्या कर्णधारपद सोडण्यावरून कपिल देव संतापले!

‘आपण भूतकाळ बदलू शकत नसलो तरी…’; शिल्पाने राज कुंद्रासोबतच्या नात्याबाबत दिले संकेत

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More