आम्ही भिकारी नाही, वाटेल तो संघर्ष करू आणि आमच्या हक्काचं घेऊ- देवेंद्र फडणवीस
मुंबई | महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली.
सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देता अजित पवारांनी राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं म्हटलं. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.
वैधानिक विकास महामंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही मिळवून घेऊच, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
तुम्हाला हातजोडून विनंती आहे, आजच वैधानिक विकास महामंडळ जाहीर करा. हवं तर मी अर्थसंकल्पावर बोलणार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“नाना पटोले फार हुशार आहेत, श्रेय घेण्यासाठी नाना पटोलेंची हुशारी”
‘…तर आम्ही एक मिनिटही बसणार नाही’; सभागृहात फडणवीस आक्रमक
‘पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी इतके कोटी रूपये घेतले’; शांता राठोडांचा मोठा गौप्यस्फोट-
शिवसेनेचा आणखी एक नेता भाजपच्या रडारवर?; किरीट सोमय्यांच्या त्या ट्विटने खळबळ
संजय राऊतांनी केलं राहुल गांधींचं कौतुक, म्हणाले…
Comments are closed.