बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत’; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई | भाजप नेत्यांनी लॉकडाऊनला विरोध करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच लॉकडाऊन केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला होता. याला उत्तर देत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना फटकारलं.

विरोधक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा देत आहेत. मी म्हणतो त्यांनी आता रस्त्यावर जरुर उतरावं. पण कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. याला प्रत्युत्तर देत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी इतर देशांनी कोरोनाकाळात जाहीर केलेल्या पॅकेजची माहिती देत मुख्यमंत्र्यांवर टीका केलीये. युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय… तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचं प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबवण्यात अधिक मदत करेल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; जाणुन घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्ही मला व्हिलन ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!

निवडणूका आहेत तिकडे कोरोना नाही का?, उद्धव ठाकरे म्हणाले…

तुम्हाला विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More