महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण…- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मी सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय. मध्ये खड्डे आणि अडचणी येत असतात, पण त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण जेव्हा ते कार चालवत असतात तेव्हा त्यांच्यासाठी सर्व ट्राफिक थांबलेलं असतं. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असं सरकार चालवता येत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे, असं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन”

‘या’ गावात सुनेने सासूचा तर जावयाने सासऱ्याचा केला पराभव

वादात सापडलेल्या ‘तांडव’ वेबसीरिजच्या दिग्दर्शकाने मागितली माफी!

“मी येत्या दोन दिवसांत मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद घेणार”

21 वर्षाचा पोरगा सगळ्यांना पुरुन उरला; सर्वात तरुण सरपंच होणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या