नाभिक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मुख्यमंत्र्यांकडून माफी

उस्मानाबाद | नाभिक समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाची माफी मागितलीय. पुण्यातील साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर नाभिक समाज संतप्त झाला होता. उस्मानाबादमध्ये नाभिक समाजाने जोडे मारो आंदोलन केलं. तर धुळ्यात नाभिक समाजाकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. 

दरम्यान, आपल्याकडून अनावधानाने नाभिक समाजाविषयी वक्तव्य झालं. त्यामागे कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात स्पष्ट केलंय. 

पाहा मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं होतं?