महाराष्ट्र मुंबई

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही- देवेंद्र फडणवीस

File Photo

मुंबई | आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला असताना आणि लोकं मृत्यमुखी पडत असताना काही लोकं वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन काम केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाषणं तर अनेक लोक करतात, अनेकांना ती कला चांगली अवगतही आहे. पण मैदानात संघर्षाची वेळ आल्यानंतर घरात लपून बसणारे, मैदानातून पळ काढणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

भाजप नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स; व्हिडीओ व्हायरल!

“देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत त्यांनी आता सुदर्शन काढावं”

“शरद पवारांनी दिलेली वाट तात्पुरती, कॉंग्रेसला कोणीही संपवू शकत नाही”

“अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा”

‘महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी’; शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या