बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदींनंतर देवेंद्र फडणवीस सक्षम नेतृत्व, त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या”

मुंबई | भाजपाने नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे. या विषयी ब्राह्मण महासंघाने अभिनंदन करत मोठी मागणी केलीये.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस विजयाची घोडदौड कायम ठेवतील, असा ब्राम्हण महासंघाने व्यक्त केलाय.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More