मुंबई | शिवसेनेचा आज 53 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मुंबईमध्ये वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे.
‘मातोश्री’वर मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेकडून अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्विकारत वर्धापन दिन सोहळ्याला येण्याचं मान्य केलं आहे.
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेनं एकदिलाने लढावं आणि मोठा विजय मिळवावा. यासाठी युतीचे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्धापन दिन सोहळ्यात इतर पक्षातील नेते सहभागी होत असल्याचं पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-बाईक चालवण्यासाठी ठेवला चक्क ड्रायवर
-पुढच्या वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश
-आमचा पक्ष कचरा बाहेर फेकतोय आणि मोदी जमा करतायेत; ममतांचा मोदींवर निशाणा
-बदललेल्या नियमानुसार फडणवीसांना आता ‘फडण दोन शून्य’ म्हटलं जाईल; मनसेची टीका
-सुधरा नाहीतर… पोलीस अधीक्षक संदीप पाटलांनी 85 पोलिसांना ‘कामाला लावलं’!
Comments are closed.