मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपप्रवेशाबाबत सबुरीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात दिल्लीत चर्चा करून प्रवेशाबाबत भूमिका घेऊ, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
दिल्लीत भाजप श्रेष्ठींची चर्चा केल्यानंतर राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश निश्चित असून फक्त मुहूर्त काढायचा आहे, असं जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
दरम्यान, राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देखील दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, भारतातील हवा आणि पाणी चांगलं नाही…
-RSS च्या लोकांसारखी चिकाटी हवी; त्यांच्याकडून काहीतरी शिका- शरद पवार
-“भाजपजवळ 303 तर शिवसेनेजवळ 18 खासदार; राम मंदिर करायला आणखी काय पाहिजे”
-सार्वजनिक बँकांना बुडवण्यात भाजप नेते पु़ढे; ‘या’ नेत्यावर काँग्रेसने केला आरोप
-एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी; कारभार पारदर्शी नसल्याचा लोकयुक्तांचा ठपका
Comments are closed.