मुंबई | विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रविवारी सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. राज्यातील पोलिस बदलीतील गोपनीय अहवाल फुटल्याप्रकरणी पोलिसांनी फडणवीसांच्या निवासस्थानीच त्यांची चौकशी केली.
देवेंद्र फडणवीसांनी चौकशीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं. मुंबई पोलिसांनी आधी दिलेली प्रश्नावली आणि आज विचारलेले प्रश्न यात एक गुणात्मक अंतर असल्याचं फडणवीस म्हणाले. मीच गोपनीयता कायद्याचा भंग केला, असाच एकुण प्रश्नांचा रोख होता. मला आरोपी किंवा सहआरोपी बनवता येईल का?, अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले, असा खुलासा फडणवीसांनी केला.
विधानसभेत सरकारविरोधात मुद्दे मांडत असल्यानेच अचानक नोटीस पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. पण मी या दबावाला बळी पडणार नाही, असा इशारा फडणवीसांना दिला आहे. तर केंद्रीय गृहसचिवांना दिलेली कागदपत्रे मी नाही तर मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकारांना दिली, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
दरम्यान, महाघोटाळा घडल्यानेच प्रकरण सीबीआयकडे सोपवले असा याचा अर्थ होतो. राज्य सरकारने हा अहवाल तब्बल सहा महिने दडवून ठेवला होता. राज्य सरकारने महाघोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
आनंदाची बातमी! आता फक्त ‘इतक्या’ रूपयात मिळेल गॅस सिलेंडर
“नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू”
गरोदर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!
सोनिया गांधी आणि राहुल गांधी राजीनामा देणार?, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं…
पोस्टाच्या ‘या’ योजनेबद्दल ऐकलंय का?, फक्त 95 रूपयात लाखोंचा फायदा होणार
Comments are closed.