महाराष्ट्र मुंबई

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई | फडणवीस यांनी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरोना लस मोफत द्यावी, अशी मागणी केली. यावर केंद्र सरकार राज्याला निधी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असता फडणवीस यांनी ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लसी संदर्भात सर्व प्रोटोकॉल केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ठरवले आहेत. पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे. आमची अपेक्षा अशी आहे की अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केलं आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

महाराष्ट्राने देखील केंद्र सरकारची मदत घ्यावी. किमान गरीब आणि मध्यम वर्गाला ही लस मोफत द्यावी, अशी आमची मागणी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी मागील वर्षी देखील या देवीच्या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडत असतात. एकिकडे मातेचा आशीर्वाद घेत असताना आपण मातांना शक्ती रुपी मानले आहे. कोरोना काळात मोठे संकट आले असताना भारतात नरेंद्र मोदी यांच्यामार्फत आपण नियमांचं पाळन केलं. वेगवेगळ्या उपाय योजना आपण करत आलो, असं फडणवीसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

मला महिलांच शरीर आवडतं, पण डोकं नाही- राम गोपाल वर्मा

नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!

“पीडित महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्काराची घटना टळली असती?

कटकट बंद करा!; बिग बींच्या आवाजातील त्या काॅलरट्यूनविरोधात जनहित याचिका

“2024मध्ये काँग्रेसला एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या