बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे”

सोलापूर | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप विरोधात बोचरी टीका केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनते देवेंद्र फडवीसांनी मुंडेना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपला मातीत गाडा, असं धनंजय मुंडे म्हणाले  होते. त्यावर फडणवीसांनी अरे वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे, असा टोला त्यांनी मुंडेंना लगावला आहे.

अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. दोन-चार खासदार असणाऱ्या पक्षाच्या मंत्र्याने अशी भाषा वापरू नये, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. फडणवीस सोलापूरमधील अक्कोलकोट येथे विविध विकासकामांच्या भुमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.

एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. एसटी कर्मचारी संपावर आहेत. दुसरीकडे यांचे मंत्री नाचगाण्याचे कार्यक्रम करत आहेत, असा घणाघात फडणवीसांनी यावेळी केला आहे. शिवाय आम्हाला गाडण्याची भाषा करु नका. आमचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पुष्कळ आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी महाविकास आघाडीला देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. सरकार येऊन दोन वर्षे झाली. मात्र शेतकऱ्यांकडेे पाहायला यांना वेळ नाही. हे सरकार फक्त वसूली सरकार आहे. शेतकऱ्याकडून वसूली कर. सामान्यांकडून वसूली कर. हेच प्रकार सध्या सुरू आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

“पोलिसांना कलेक्शनसाठी वापरता मग ड्रग्ज रोखण्यासाठी का वापरत नाहीत?”

“पडळकरांच्या जिवाला काही झाल्यास राष्ट्रवादीचे नेते जबाबदार असतील”

“तेच मी माझ्या बंधूंना गेली कित्येक दिवस सांगतोय की…”

“एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा अन्यथा…”

राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ माजी आमदाराची भाजपमध्ये एन्ट्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More