Top News

“स्वत: मोदींनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय, तुम्ही काय करणार हे सांगा”

File Photo

मुंबई | स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे वारंवार केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा प्राथमिक जबाबदारी ही राज्याची आहे. तुम्ही काय करणार हे पहिले सांगा, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधलाय. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. आधी कोकणात मग विदर्भात, आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे, असं फडणवीस म्हणालेत.

राज्य सरकारकडून तात्काळ मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण सरकारकडून अशी कुठलीही मदत दिली जात नाही. हे सरकार गंभीर नाही. हे सरकार फक्त घोषणा करतं. परिस्थितीला गांभिऱ्याने घेत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ जारी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही- शरद पवार

पुण्यात मध्यरात्रीनंतर तुफान पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती

“इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या