बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत”

मुंबई | गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या-

शेतात पत्नीसोबत शरीरसुखाचा आनंद घेतला, त्यानंतर उचललं काळजाचा थरकाप उडवणारं पाऊल

‘या’ SUV ने विक्रीबाबतचे मोडले सर्व रेकॉर्ड, 4 महिन्यात इतक्या हजार गाड्या बुक

“स्वार्थासाठी कोण काम करतय, हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती”

धक्कादायक! शिंक आली म्हणून सरकारी कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

अमेरिकेतील जोडप्यानं चक्क धोतर आणि साडी नेसून केलं स्कीइंग; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More