Top News महाराष्ट्र मुंबई

मला देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं झालेलं पाहायचंय- संजय राऊत

मुबंई | देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर काम करताना आणि मोठं झालेलं पाहायचंय, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊत बोलत होते.

फडणवीस हे माझे मित्र आहेत. राजकारणात कोणीही एकमेकांचा शत्रू नसतो. आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

आम्ही आमचे राजकारण करत राहणार, ते त्यांचे राजकारण पुढे नेतील. या सगळ्यातून एकमेकांना विरोध होणं क्रमप्राप्त आहे, पण म्हणून लगेच तलवार काढायची नसते, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

राजकीय विरोधकांमध्ये चांगले संबंध असणं ही महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा आहे. एकेकाळी शरद पवार हे आमच्याविरोधात होते. तरीही मी त्यांना भेटायचो. यावर अनेकजण आक्षेपही घ्यायचे. मात्र, इतकी वर्षे राजकारणात असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या नेत्याला भेटणे गरजेचं आहे. त्यांचे म्हणणं समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे वेळ मिळाल्यावर मी सगळ्याच राजकीय नेत्यांना भेटत असतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; आमदार एनडीएत सामील होण्याची शक्यता

“किरीट सोमय्या यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांनी…”

नितीश कुमारांनी दिला राजीनामा, नेता निवडीसाठी एनडीएची उद्या बैठक

सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच- संजय राऊत

भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या