मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाराष्ट्रात सत्तापालट होणार?
मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. महाराष्ट्रात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात असताना भाजपच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात भाजपने अखेर अधिकृतपणे उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी केली आहे. भाजपच्या मागणीनंतर आता 30 तारखेला महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.
दरम्यान, 30 तारखेला सकाळी 11 वाजता राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार टिकणार की पडणार, राज्यात सत्तापालट होणार का? हे आता येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, याचा काय अर्थ?’; एकनाथ शिंदेंचा घणाघात
मुकेश अंबानींकडून जिओच्या संचालक पदाचा राजीनामा, आकाश अंबानींना दिली महत्त्वाची जबाबदारी
‘मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही’, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान, म्हणाले…
‘जे नाव एकनाथने दिलं त्याला विरोध नाही’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed.