फडणवीसांना आपल्यावर असलेला विश्वास पाहून अजित पवारांना हसू अनावर
मुंबई | मुंबईत सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन काळात अनेक रंजक घडामोडी आणि किस्से घडत असतात. मंगळवारचा दिवस गाजवला तो विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढलेच मात्र या दरम्यान त्यांनी सांगितलेले किस्से तसेच कोपरखळ्यांनी सभागृहात हास्यकल्लोळही माजला होता.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी धमाल उदाहरण दिले. समोर अजित पवार बसले होते, त्यावेळी ते म्हणाले, समजा दादांनी मला मारलं, तसे ते मला मारणार नाहीत मात्र समजा मारलं तर…. देवेंद्र फडणवीसांचं हे वाक्य पूर्ण होत नाही तोच समोरच्या बाकांवरुन आवाज आला, “चंद्रकांतदादा मारतील” त्यावर “ते दादा तर बिलकूलच मारणार नाहीत”, असं फडणवीसांनी आत्मविश्वासानं सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यांवर अजित दादा खळखळून हसत होते. इतर सदस्यांनीही या प्रसंगाची चांगलीच मजा घेतली आणि सभागृहात हशा पिकला होता. हा प्रसंग घडल्यानंतर फडणवीसांना अजित पवार यांच्यावर असलेला एवढा विश्वास नेमका काय सांगतो याच्या चर्चाच त्यानंतर दिवसभर रंगल्या होत्या.
दरम्यान, विधानसभेत मंगळवारचा दिवस गाजला तो शेतकऱ्यांची वीज तोडण्याच्या मुद्द्यावरुन… सरकारने या प्रकरणी माघार घेत वीज तोडली जाणार नसल्याची ग्वाही यावेळी सभागृहात दिली. त्याआधी भाजप आमदारांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन केलं होतं. भाजप आमदार राम सातपुते यांनी तर चक्क मोटर गळ्यात घालून विधानभवन परिसरात प्रवेश केला होता.
थोडक्यात बातम्या-
“सेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकलाय”
एक शेतकरी जेव्हा अजय देवगणच्या गाडीपुढे उभा ठाकला, पाहा व्हिडीओ-
पूजा चव्हाण प्रकरणात समोर आला पुणे पोलीस आयुक्तांचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ
आणीबाणी ही काँग्रेस सरकारची चुक होती- राहुल गांधी
धक्कादायक!; मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं एकच खळबळ
Comments are closed.