बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर मुंबईचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले…

मुंबई | दिल्ली कॅपिटल्सवर सहजरित्या विजय मिळवत मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल जिंकली आहे. या जेतेपदासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली.

जेतेपद पटकावल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इंडियन्सचं कौतुक केलं आहे. खास शब्दांत फडणवीस यांनी मुंबईच्या संघावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलंय. ते म्हणतात, “…आणि पुन्हा एकदा आमची मुंबई इंडियन्स विजयी ठरलीये. पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावल्याबद्दल संपूर्ण संघाचं मनापासून अभिनंदन! रोहित… तू खरंच एक उत्तम कर्णधार आहेस. तुमच्या सर्वांचा अभिमान आहे.”

या विजेतेपदाने मुंबईने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलंय. यापूर्वी 2013, 2015, 2017 आणि 2019 या वर्षांत जेतेपद गवसणी घातली आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीवर मुंबई भारी; पाचव्यांदा जिंकली आयपीएलची ट्राॅफी

‘विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं’; तेजस्वी यादव यांचा खळबळजनक आरोप

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे, पण…- शरद पवार

“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”

संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More