बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीश कुमार मुख्यमंत्री बनणार? शिवसेनेच्या टीकेवर फडणवीसांचं उत्तर!

मुंबई | बिहारमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखलीये. या विजयावर माजी मुख्यमंत्री आणि बिहारमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री जेडीयूचाच होईल. त्यामुळे ते नितीश कुमार असतील हे आधीच ठरलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तशी घोषणा केली होती. यामुळे या निर्णयामध्ये बदल होणार नाही कारण भाजपा शब्दाचं पक्क आहे.”

“महाराष्ट्रात मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर त्यांच्या संमतीने भाजपाचा मुख्यमंत्री होईल घोषणा केली होती. आम्ही त्यावर अडून राहिलो होतो. इथे मोदींनी जेडीयूचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका घेतली असून आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात काम करु,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचलेलं नाहीये. त्यांना काही ठिकाणी नोटापेक्षाही कमी मतं मिळालीयेत. शिवसेनेने याचं आत्मचिंतन केलं पाहिजे,” असंही देखील फडणवीस यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

…त्यावेळी मी माझी विकेट द्यायला हवी होती- रोहित शर्मा

“बिहारमध्ये शिवसेनेची जी अवस्था केली तशी महाराष्ट्रातंही संजय राऊत करतील”

निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो- शिवसेना

अलिबाग कारागृहात अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी 2 पोलीस निलंबित

आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर मुंबईचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More