बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्थ मंत्रिमंडळ तुरुंगात असतं”

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणादरम्यान केंद्र सरकार हा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. तसेच वारंवार केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येतो. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी म्हटलं की, ‘केंद्र सरकार हे यंत्रणांचा गैरवापर कधीही करत नाही, जर आम्ही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं’, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस आणि इतर पक्षांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तसा आम्ही केला नाही. तसेच आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत, असं म्हणत भ्रष्टाचाराला पूर्णपणे संपवल्याशिवाय मोदी शांत बसणार नाही. त्यामुळे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी घाबरावं, ज्यांनी नाही केला त्यांनी घाबरू नये, असं म्हणत फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतूनच हल्ला चढवला.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे, असं म्हटलं होतं. त्यावर जोपर्यंत भाजप जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असं म्हणत खंडणी आणि युनियनबाजीमुळे बंगालमध्ये आतापर्यंत एकही उद्योग टिकला नाही, अशी परिस्थिती विषद करत फडणवीसांनी त्याला जोरदार विरोध दर्शविला आहे.

थोडक्यात बातम्या

आता गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये वाचवा पैसे, कसं ते वाचा सविस्तर

“…पण जेव्हा सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही”

पुण्यात डिझेलची शंभरी पार तर दुसरीकडे पुणेकरांचा रिक्षाप्रवासही महागला

अजित पवारांच्या नातेवाईकांकडे आयकर विभागाने जप्त केली तब्बल एवढ्या कोटींची बेहिशेबी मालमत्ता

पुढच्या वर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का? धोनीने दिलं हे उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More