Top News महाराष्ट्र मुंबई

चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशध्यक्षपदाचा राजीनामा द्यावी, अशी मागणी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. भाजपमधील या अंकर्गत कलहावर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजीनामा मागणारे कोण कार्यकर्ते आहेत हे मला माहिती नाही. पण एखादी निवडणूक हरल्यानंतर अशा प्रकारे जे लोक बोलत आहेत ते बेशिस्त करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मी आणि चंद्रकांत दादा त्यांच्याशी बोलून घेऊ. त्या लोकांचा हेतू वाईट आहे. चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली 105 आमदार निवडुन आले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपला यश मिळालं असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी पाटलांच्या प्रदेशाध्यपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मी हाडाचा शेतकरी आहे’; वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करणाऱ्या दानवेंवर कडूंनी साधला निशाणा

‘हिंमत असेल तर भाजपने राष्ट्रगीत बदलून दाखवावं’; ममता बॅनर्जींचं भाजपला आव्हान

“कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलं”

….म्हणून मी हाडाचा शेतकरी आहे बनावट नाही- रावसाहेब दानवे

“भाजपने मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजाची दिशाभूल करणे थांबवावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या