बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”

मुंबई | महाविकास सरकार कोरोनावर मात करण्यात कमी पडत आहे. रुग्णांना बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर तर कुठे गाडीमध्ये, जमिनीवर रूग्णांना ऑक्सिजन लावण्यात येत आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करत असल्याचं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला.

कांदिवली येथील भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटर आणि नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे रविंद्र जोशी फाउंडेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्यावेळी दरेकर बोलत होते.

महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार मात्र फक्त केंद्रावर टीका करण्यात व्यस्त आहे. एकीकडे सरकार केवळ आरोप करण्यात व्यस्त असताना फडणवीस यांच्यासारखे जनतेचे खरे प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देत आहेत. अशीच मेहनत करून लवकरात लवकर राज्याला व पर्यायाने देशाला आपण कोरोनामुक्त करूया, असं प्रविण दरेकर म्हणाले.

दरम्यान, नागपूरमधये कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याचं लक्षात आल्यावर देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये ठाण मांडून तेथील रूग्णसंख्या आटोक्यात आणली. नागपूरात अशी परीस्थिती असताना नागपूरबरोबरच देवेंद्रजी मुंबईतही वेळ देतात. यावेळी त्यांनी दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे झालेल्या कोविड सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमाचीही आठवण करून देत देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले.

थोडक्यात बातम्या- 

“संकट आलं की केंद्राकडे बोट दाखवायचं हीच महाराष्ट्राची ओळख झाली”

परमबीर सिंहांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला; अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याचा पत्राद्वारे गौप्यस्फोट

पुणेकरांच्या मदतीसाठी धावला हरभजन सिंग, केली ‘ही’ लाखमोलाची मदत

मोठी बातमी! सुजय विखेंनी विमानाने आणलेले रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश

“आयपीएल खेळणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो… तुम्हीही भारताला मदत करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More