महाराष्ट्र मुंबई

“फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत, धमकी देणारा मुख्यमंत्री आपण पाहिला नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली. याला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार दिलं आहे.

एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका, असा इशारा धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून ग्लेन मॅक्सवेलने मागितली केएल राहुलची माफी

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘या’ महिन्यात;वर्षा गायकवाड यांची माहिती

ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांची टीका

ठाकरे सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण…- देवेंद्र फडणवीस

ज्यांनी चिरडण्याची भाषा केली ते फार काळ टिकले नाहीत- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या