Top News

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई | जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय.

घरच्यांच्या संदर्भात जो काही विषय मांडला जात आहे, त्याबद्दल बोलायचं तर आम्ही कोणाच्याही घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कोणाच्याही घरच्यांवर टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. जर घरच्यांवरील टीकेबाबत बोलायचं झालं तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण मी स्वत: आहे, असं फडणवीस म्हणाले.

माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय बोलतात, काय लिहितात, ट्विटरवर काय टाकतात हे साऱ्यांना माहिती आहे. पण मी त्याचा कांगावा करत नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत गायलेलं ‘तिला जगू द्या’ गाणं रिलीज झालं. हे गाणं रिलीज झाल्यानंतर अमृता फडणवीस यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर मौन सोडलं.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून ग्लेन मॅक्सवेलने मागितली केएल राहुलची माफी

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘या’ महिन्यात;वर्षा गायकवाड यांची माहिती

ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांची टीका

ठाकरे सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण…- देवेंद्र फडणवीस

ज्यांनी चिरडण्याची भाषा केली ते फार काळ टिकले नाहीत- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या