बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राठोडांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही राजीनामा देणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच पूजा चव्हाण प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राठोडांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

संजय राठोड यांच्यावर कारवाई होत नाही. त्यावर मी राठोड यांना दोष देणार नाही. त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा आणला आहे. पण राज्यातील मंत्रीच या अत्याचारात सहभागी आहेत. सत्ता पक्षाच्या लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे का? ही कोणती शक्ती आहे? सामान्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं काही आहे का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. पुण्याचे पीआय… जे पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करत आहेत, त्यांना निलंबित करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, सरकारने राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा आधीच विरोधकांनी सरकारला दिलाय. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला घेरू नये यासाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून इमरान हाश्मीने दिला आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार!

वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!

“शासन व समाज मुर्दाड बनलेत, पोलीस कधी नव्हे एवढे लाचार अन् लबाड झालेत”

दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

संजय राठोडांचं ठरलं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More