Top News उस्मानाबाद महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला?- देवेंद्र फडणवीस

उस्मानाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला. मात्र त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळाला का, असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पुरात वाहून गेली. या सगळ्याची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. आमच्या काळात मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामा म्हणून ग्राह्य धरले जात होते. राज्य सरकारने आताही तेच करावे. त्याआधारे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. यानंतर दीर्घकालीन मदतीचा निर्णय घ्यावा, असं फडणवीस यांनी सांगितलं.

केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत नक्कीच देईल. पण राज्य सरकारने प्रथम आपण काय मदत देणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही, पण- देवेंद्र फडणवीस

“कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार”

रिपब्लिक टीव्ही परमबीर सिंग यांच्याविरोधात करणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

‘देशात कोरोना समूह संसर्ग’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या