Top News

…तर आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री व्हावं- देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल. शिवसेनेची इच्छा असेल तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

आदित्य ठाकरे काय करणार किंवा त्यांना कोणतं पद दिलं जाईल हा निर्णय शिवसेनेचा असेल. जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणताच संभ्रम नाही. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे सर्वांनाच माहित  आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केला आहे. तसेच मी भाजपचा आणि शिवसेनेचा देखील मुख्यमंत्री आहे, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, पक्षाने गेल्या पाच वर्षात चांगलं काम केलं आहे. मला आज कोणतीही भीती वाटत नाही. कारण माझ्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष भक्कमपणे उभे आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या